रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ जुलै) नवे २८२ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ६३१ जण करोनामुक्त झाले. सलग दुसऱ्या दिवशी नवबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६६ हजार ४९९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.९३ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या चार हजार ६२० नमुन्यांपैकी चार हजार ४२५ अहवाल निगेटिव्ह, तर १९५ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ८१३ पैकी दोन हजार ७२६ अहवाल निगेटिव्ह, तर ८७ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून २८२ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७० हजार ७९३ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ९८ हजार ४३७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज एक हजार ९९९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ४७५, तर लक्षणे असलेले ५२४ रुग्ण आहेत. एक हजार १२५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २९०, डीसीएचसीमधील २८९, तर डीसीएचमध्ये २३५ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १८९ जण ऑक्सिजनवर, ८४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज आधीच्या ४ आणि आजच्या ९ अशा एकूण १३ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. आजचा मृत्युदर २.८७ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार ३३ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३०, दापोली १८०, खेड १८१, गुहागर १५१, चिपळूण ३८७, संगमेश्वर १८०, रत्नागिरी ६८९, लांजा १०६, राजापूर १२९. (एकूण २०३३).

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply