रत्नागिरी जिल्ह्यात नवे २९० करोनाबाधित, ३७५ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ जुलै) नवे २९० करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ३७५ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ६५ हजार ८६८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.४२ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा –
आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या तीन हजार ७१५ नमुन्यांपैकी तीन हजार ५५१ अहवाल निगेटिव्ह, तर १६४ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ७६९ पैकी एक हजार ६४३ अहवाल निगेटिव्ह, तर १२६ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून २९० पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७० हजार ५११ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ९१ हजार २८६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज दोन हजार २०१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ६३७, तर लक्षणे असलेले ५६४ रुग्ण आहेत. एक हजार ५१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ५११, डीसीएचसीमधील ३२२, तर डीसीएचमध्ये २४२ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी १८९ जण ऑक्सिजनवर, ८४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज आधीच्या १३ आणि आजच्या ३ अशा एकूण १६ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. आजचा मृत्युदर २.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार २० झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड २९, दापोली १७९, खेड १८१, गुहागर १५०, चिपळूण ३८४, संगमेश्वर १८०, रत्नागिरी ६८३, लांजा १०६, राजापूर १२८. (एकूण २०२०).

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply