सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ४५ हजार ५०७ रुग्ण बरे झाले

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्यात आज (६ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ५०७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात २ हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४२ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत दुबार तपासणी केलेल्या दोघांसह आज करोनाचे नवे १४० रुग्ण आढळले, तर १०१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४९ हजार ६९ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३३२, दोडामार्ग ५९, कणकवली ४०१, कुडाळ ६२८, मालवण ३०७, सावंतवाडी २६४, वैभववाडी १२६, वेंगुर्ले १६६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १५. सक्रिय रुग्णांपैकी ११० रुग्ण ऑक्सिजनवर तर २७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १७, दोडामार्ग – ३, कणकवली – २२, कुडाळ – ४६, मालवण – ११, सावंतवाडी – २२, वैभववाडी – ५, वेंगुर्ले – १५, जिल्ह्याबाहेरील १.

आज जिल्ह्यात वाघोटण (ता. देवगड) आणि माणगाव (ता. कुडाळ) येथील प्रत्येकी एका एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २६२ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६२, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६४, कुडाळ – १९३, मालवण – २५८, सावंतवाडी – १७२, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply