रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांच्या संख्येत पुन्हा वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजही (६ ऑगस्ट) करोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. करोनाबाधितांची संख्याही घटली आहे.

आज २३५ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६८ हजार ४४५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.२१ झाली आहे. आज १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज नवे १७१ करोनाबाधित रुग्ण आढळले. आजच्या रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या तीन हजार ९२४ नमुन्यांपैकी तीन हजार ८०६ अहवाल निगेटिव्ह, तर ११८ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार २८५ पैकी दोन हजार २३२ अहवाल निगेटिव्ह, तर ५३ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून १७१ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७२ हजार ६४८ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ४७ हजार ३७८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज एक हजार ८६७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ४६२, तर लक्षणे असलेले ४०५ रुग्ण आहेत. ८१९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६४३, डीसीएचसीमधील १८१, तर डीसीएचमध्ये २२४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १३७ जण ऑक्सिजनवर, ७८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या ९ आणि आजच्या ४ अशा एकूण १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील २.३२ हा मृत्युदर वाढून तो २.९३ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १२९ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ७८४, तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७६२ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८४, खेड १८५, गुहागर १५४, चिपळूण ४०३, संगमेश्वर १८६, रत्नागिरी ७३१, लांजा ११४, राजापूर १४१. (एकूण २१२९).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply