सिंधुदुर्गात आज ९६ नवे करोनाबाधित, १२७ मुक्त, एकाचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१३ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या जास्त आहे. आज एकाच्या मृत्यूची नोंद झाली.

आज १२७ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४६ हजार ५४५ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज दुबार तपासणी केलेल्या चौघांसह ९६ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ८०२ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड २२, दोडामार्ग ३, कणकवली १५, कुडाळ ८, मालवण १२, सावंतवाडी १४, वैभववाडी ०, वेंगुर्ले १७ आणि जिल्ह्याबाहेरील एक. सक्रिय रुग्णांपैकी ७९ रुग्ण ऑक्सिजनवर तर १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २८०, दोडामार्ग ५३, कणकवली ३२८, कुडाळ ४९२, मालवण २८७, सावंतवाडी २८७, वैभववाडी ७१, वेंगुर्ले १५८, जिल्ह्याबाहेरील १३.

आज जिल्ह्यात झाराप (ता. कुडाळ) येथील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १२८६ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६४, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६९, कुडाळ – १९९, मालवण – २६१, सावंतवाडी – १७६, वैभववाडी – ७३, वेंगुर्ले – १००, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply