रत्नागिरीत आज १७३ नवे करोनाबाधित; १८८ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ ऑगस्ट) १७३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर १८८ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६९ हजार ८९१ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.६५ झाली आहे.

आज आढळलेल्या नव्या १७३ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३७६८ नमुन्यांपैकी ३६५७ अहवाल निगेटिव्ह, तर १११ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १९६२ पैकी १९०० अहवाल निगेटिव्ह, तर ६२ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७३ हजार ८४३ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ८८ हजार ३३१ जणांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १५८७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १२४१, तर लक्षणे असलेले ३४६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८३० आहे. १७९ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४००, डीसीएचसीमधील १५१, तर डीसीएचमध्ये १९५ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १०३ जण ऑक्सिजनवर, ६६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या ५ आणि आजच्या ५ अशा एकूण १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील ३.१५ हा मृत्युदर घटून तो २.९६ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २१८६ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८३२ (८३.८१ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७८८ (३६.०५ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३३, दापोली १८८, खेड १८९, गुहागर १५६, चिपळूण ४२३, संगमेश्वर १९२, रत्नागिरी ७४३, लांजा ११८, राजापूर १४४. (एकूण २१८६).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply