सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

आज १२१ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४६ हजार ७५२ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज १०१ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ४८ झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ८, दोडामार्ग ०, कणकवली १४, कुडाळ २५, मालवण २२, सावंतवाडी २३, वैभववाडी १, वेंगुर्ले ७. सक्रिय रुग्णांपैकी ७८ रुग्ण ऑक्सिजनवर तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २८७, दोडामार्ग ४७, कणकवली ३२६, कुडाळ ५५१, मालवण ३१२, सावंतवाडी २६१, वैभववाडी ६७, वेंगुर्ले १३१, जिल्ह्याबाहेरील ९.

आज जिल्ह्यात एकाही करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र वैभववाडी तालुक्यात आधीच्या २ रुग्णांची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २९८ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६४, दोडामार्ग – ३५, कणकवली – २७२, कुडाळ – २०१, मालवण – २६१, सावंतवाडी – १७९, वैभववाडी – ७७, वेंगुर्ले – १००, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply