रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ ऑगस्ट) १२० नवे करोनाबाधित आढळले, तर ५२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ७० हजार २०२ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.५३ टक्के झाली आहे.
आज आढळलेल्या नव्या १२० करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ४६३३ नमुन्यांपैकी ४५५६ अहवाल निगेटिव्ह, तर ७७ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या ११६४ पैकी ११२१ अहवाल निगेटिव्ह, तर ४३ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७४ हजार २७६ झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ८० हजार ३०७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज १७३० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १३९३, तर लक्षणे असलेले ३३७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ९६५, तर ३३७ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून १३६ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४२१, डीसीएचसीमधील १३८, तर डीसीएचमध्ये १९९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १२५ जण ऑक्सिजनवर, ७६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
यापूर्वीच्या ३ आणि आजच्या ३ अशा एकूण ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.१५ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३५ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२०८ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८५० (८३.७९ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७९३ (३५.९१ टक्के) आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९१, खेड १९१, गुहागर १५८, चिपळूण ४२७, संगमेश्वर १९३, रत्नागिरी ७४९, लांजा ११८, राजापूर १४७. (एकूण २२०८).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
