रत्नागिरी जिल्ह्यात ७१ नवे रुग्ण, १०३ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ ऑगस्ट) १०३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ७१ नवे रुग्ण आढळले. रत्नागिरी जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७१ हजार ८४४ झाली असून ही टक्केवारी ९५.५२ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ७१ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १७४२ नमुन्यांपैकी १७२७ अहवाल निगेटिव्ह, तर १५ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १६६२ पैकी १६०६ अहवाल निगेटिव्ह, तर ५६ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार २१४ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ३९ हजार ७१५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १०२४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७२८, तर लक्षणे असलेले २९६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५२७ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ४९७ रुग्ण असून ८० जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २०१, डीसीएचसीमधील १३६, तर डीसीएचमध्ये १६० रुग्ण आहेत. बाधितांपैकी १३७ जण ऑक्सिजनवर, ६९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आधीच्या १ आणि आजच्या २ अशा एकूण ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.६६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०१ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२९ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२६६ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८९९ (८३.८० टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८०६ (३५.५७ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९६, खेड २००, गुहागर १६१, चिपळूण ४४४, संगमेश्वर १९९, रत्नागिरी ७६५, लांजा ११९, राजापूर १४८. (एकूण २२६६).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply