रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांच्या टक्केवारीत आणखी घट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २९ ऑगस्ट) करोनामुक्तांच्या टक्केवारीत सलग दुसऱ्या दिवशी आजही किंचित घट झाली. करोनामुक्तांपेक्षा नवबाधितांची वाढलेली संख्या आणि चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे करोनामुक्तांच्या टक्केवारीत घट नोंदविली गेली.

आज ५३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १०९ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार २०७ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.४१ एवढी आहे. (काल ती ९५.४८ टक्के होती.)

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १०९ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २१७६ नमुन्यांपैकी २११३ अहवाल निगेटिव्ह, तर ६३ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १५१२ पैकी १४६६ अहवाल निगेटिव्ह, तर ४६ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार ६८३ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ५६ हजार ५६० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज ११०१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ८२६, तर लक्षणे असलेले २७५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५२९ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ५७२ रुग्ण असून ७३ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २९१, डीसीएचसीमधील १२१, तर डीसीएचमध्ये १५४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ११० जण ऑक्सिजनवर, ६३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.६६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२७ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३०२ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १९२८ (८३.७५ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८१२ (३५.२७ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली २०३, खेड २०५, गुहागर १६३, चिपळूण ४४८, संगमेश्वर २०१, रत्नागिरी ७७५, लांजा १२३, राजापूर १५०. (एकूण २३०२).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply