रत्नागिरी जिल्ह्यात करोना मृत्युदरात वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३० ऑगस्ट) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार करोनाच्या मृत्युदरात कालच्या तुलनेत वाढ झाली आहे. कालचा मृत्युदर ०.२७ टक्के होता, तर आज तो १.१७ झाला आहे.

आज १०६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ६९ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ३१३ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.४७ एवढी आहे. (काल ती ९५.४१ टक्के होती.)

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ६९ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २२१८ नमुन्यांपैकी २१७५ अहवाल निगेटिव्ह, तर ४३ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या ११०६ पैकी १०८० अहवाल निगेटिव्ह, तर २६ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार ७५२ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ५९ हजार ८१५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १०२४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७५८, तर लक्षणे असलेले २६६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४४४ आहे. संस्थात्मक विलगीकरणात ५८० रुग्ण असून १०१ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३१४, डीसीएचसीमधील ११५, तर डीसीएचमध्ये १५१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १०९ जण ऑक्सिजनवर, ५५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आजच्या १, आधीच्या ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.६६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर १.१७ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३१४ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १९४१ (८३.८८ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८१७ (३५.३१ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २०४, खेड २०८, गुहागर १६४, चिपळूण ४५०, संगमेश्वर २०२, रत्नागिरी ७७७, लांजा १२३, राजापूर १५१. (एकूण २३१४).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply