रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या एकाही मृताची नोंद नसल्याचा दिवस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल झालेल्या उच्चांकी नोंदीनंतर आज (दि. १ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली नाही.

आज ६४ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १३४ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ४३३ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.३२ एवढी आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १३४ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २१८४ नमुन्यांपैकी २१३९ अहवाल निगेटिव्ह, तर ४५ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या २४६१ पैकी २३७२ अहवाल निगेटिव्ह, तर ८९ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार १ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ६८ हजार ३१३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १०६२ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ८०९, तर लक्षणे असलेले २५३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४८९ आहे. त्यापैकी ५७३ जण संस्थात्मक विलगीकरणात असून १६३ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३२०, डीसीएचसीमधील ११४, तर डीसीएचमध्ये १३९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १०४ जण ऑक्सिजनवर, ५३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.९५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०९ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३४३ एवढीच आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १९६६ (८३.९१ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८२५ (३५.२१ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २०९, खेड २१३, गुहागर १६६, चिपळूण ४५७, संगमेश्वर २०२, रत्नागिरी ७८४, लांजा १२३, राजापूर १५४. (एकूण २३४३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply