रत्नागिरीत आज १३३ जण करोनामुक्त; ६५ नवे रुग्ण


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १६ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार १३३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ६५ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७३ हजार ५९८ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९५.३६ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ६५ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३९० नमुन्यांपैकी ३७१ अहवाल निगेटिव्ह, तर १९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या २४११ पैकी २३६५ अहवाल निगेटिव्ह, तर ४६ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार १७९ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख १५ हजार ७०९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ८७६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ५१७, तर लक्षणे असलेले ३५९ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४५९ आहे, तर ४१७ जण संस्थात्मक विलगीकरणात असून ३२६ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ५८, डीसीएचसीमधील १९०, तर डीसीएचमध्ये १६९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ७४ जण ऑक्सिजनवर, ३६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या एका आणि आजच्या दोन अशा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.१३ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२३ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३७९ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१४, खेड २१७, गुहागर १६६, चिपळूण ४६६, संगमेश्वर २०६, रत्नागिरी ७९४, लांजा १२४, राजापूर १५७. (एकूण २३७९).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply