syringe and pills on blue background

रत्नागिरीत सलग चौथ्या दिवशी १००हून अधिक रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २१ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार १३९ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ८९ नवे करोनाबाधित आढळले. रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी करोनामुक्तांची संख्या १००पेक्षा जास्त आहे.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७४ हजार ३६३ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी वाढून ती ९६.१३ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ८९ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५८१ पैकी ५५५ अहवाल निगेटिव्ह, तर २६ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १९९८ नमुन्यांपैकी १९३५ अहवाल निगेटिव्ह, तर ६३ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार ३५७ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ३१ हजार ८६३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ५९८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३५७, तर लक्षणे असलेले २४१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३२९ आहे, तर २६९ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आता एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. तसंच, ७१ जणांची नावं दोनदा नोंदवली गेलेली असल्याने ती कोविड पोर्टलवरून काढून टाकण्यात आली आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २८, डीसीएचसीमधील ७०, तर डीसीएचमध्ये १७१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ७१ जण ऑक्सिजनवर, ३५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.०५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१० टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३३ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३९६ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३७, दापोली २१४, खेड २२०, गुहागर १६६, चिपळूण ४७१, संगमेश्वर २०८, रत्नागिरी ७९७, लांजा १२४, राजापूर १५९. (एकूण २३९६).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply