रत्नागिरीत आज ८० नवे रुग्ण; ४३ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २३ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ४३ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ८० नवे करोनाबाधित आढळले.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७४ हजार ४५९ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी ९६.०४ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ८० करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १५६७ पैकी १५३८ अहवाल निगेटिव्ह, तर २९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १८८५ नमुन्यांपैकी १८३४ अहवाल निगेटिव्ह, तर ५१ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार ५२७ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ३८ हजार ४८३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ६६० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४२६, तर लक्षणे असलेले २३४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३९१ आहे, तर २६९ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आता एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३५, डीसीएचसीमधील ८९, तर डीसीएचमध्ये १४५ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६४ जण ऑक्सिजनवर, २९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या सहा आणि आजच्या एका अशा एकूण सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.०५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.१५ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४०८ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२१, गुहागर १६६, चिपळूण ४७१, संगमेश्वर २०९, रत्नागिरी ८०१, लांजा १२४, राजापूर १५९. (एकूण २४०८).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply