सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२३ सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत जिल्ह्याबाहेरील लॅबमधील पाच जणांच्या तपासणीसह ६३ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ७७ जण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत एका करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज नवे ६३ करोनाबाधित आढळले, तर ७७ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ५५९ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग १, कणकवली १४, कुडाळ ८, मालवण १८, सावंतवाडी ११, वैभववाडी २, वेंगुर्ले ५. जिल्ह्यात सध्या १२०२ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४४ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १३३, दोडामार्ग ४९, कणकवली २०४, कुडाळ ३०२, मालवण २२३, सावंतवाडी १५०, वैभववाडी ४२, वेंगुर्ले ८८, जिल्ह्याबाहेरील ११.
आज जिल्ह्यात एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. मसदे या मालवण तालुक्यातील गावातील ६० वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाबाचा त्रासही होता. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३९१ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७३, दोडामार्ग – ३९, कणकवली – २८८, कुडाळ – २२६, मालवण – २७७, सावंतवाडी – १९२, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media