pexels-photo-4031867.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ६० रुग्ण, तर ३० जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ३० रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे ६० रुग्ण आढळले.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच्या जिल्ह्याबाहेरील लॅब तपासणीसह आज नवे ६० करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ६६६ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग ६, कणकवली ११, कुडाळ १९, मालवण १३, सावंतवाडी ०, वैभववाडी ४, वेंगुर्ले २.

जिल्ह्यात सध्या ५९२ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४४ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ४७, दोडामार्ग २६, कणकवली ११०, कुडाळ १७८, मालवण १०६, सावंतवाडी ६१, वैभववाडी ७, वेंगुर्ले ५५, जिल्ह्याबाहेरील २.

मागील २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यापूर्वीच्या एका मृत्यूची नोंद आज पोर्टलला झाली आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४३९ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७८, दोडामार्ग – ४२, कणकवली – २९६, कुडाळ – २४१, मालवण – २८६, सावंतवाडी – १९८, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

लसीकरण स्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ८ हजार १४० नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील १ लाख २५ हजार ८२१ व्यक्तींनी पहिला डोस, तर ८१ हजार ८० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील १ लाख ४८ हजार ४०० नागरिकांनी पहिला डोस, तर ९० हजार ३४७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील २ लाख १४ हजार १६७ जणांनी पहिला डोस, तर ७७ हजार ८८७ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ९८३५ हेल्थ वर्कर्सनी पहिला डोस, तर ८०६१ जणांनी दुसरा डोस घेतला. ९९१७ फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला डोस, तर ८७१२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे जिल्ह्यातील एकूण ७ लाख ७४ हजार २२७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ६९ हजार १२० लशी उपलब्ध असून, त्यापैकी ५४ हजार ३० कोविशिल्डच्या आणि १५ हजार ९० कोव्हॅक्सिन आहेत. जिल्ह्यात सध्या ४१०० लशी शिल्लक असून, त्यापैकी ४०५० कोविशिल्ड आणि ५० कोव्हॅक्सिन आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply