hands with latex gloves holding a globe

रत्नागिरी जिल्ह्यात आज चार मृत्यू; जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या ३३७वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १४ ऑक्टोबर) करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आज नवे २३ रुग्ण आढळले, तर ५३ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३७ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२ लाख ४१ हजार ४४ जणांचं लसीकरण झालं आहे.

जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे २३ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ५७२ झाली आहे. आज ५३ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत ७५ हजार ७८५ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.४५ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ८५१ पैकी ८४३ अहवाल निगेटिव्ह, तर ८ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ७७५ नमुन्यांपैकी ७६० अहवाल निगेटिव्ह, तर १५ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ८४ हजार ५०६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ३३७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले २२२, तर लक्षणे असलेले ११५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २१८ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात ११९ जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४, डीसीएचसीमधील ४९, तर डीसीएचमध्ये ६६ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ४५ जण ऑक्सिजनवर, २९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१२ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर १.१९ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४५० एवढी आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२३, गुहागर १७२, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१५, रत्नागिरी ८१७, लांजा १२८, राजापूर १६२. (एकूण २४५०).

लसीकरण स्थिती

१३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात १०२ लसीकरण सत्रं पार पडली. त्यात ८९९१ जणांनी पहिला, तर २०९६ जणांनी दुसरा डोस घेतला. १२ ऑक्टोबरला १०,२१५ जणांचं, तर १३ ऑक्टोबरला ११,०८७ जणांचं लसीकरण झालं.

१३ ऑक्टोबर २०२१ रोजीपर्यंतच्या स्थितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १२ लाख ४१ हजार ४४ जणांचं लसीकरण झालं आहे. त्यापैकी ८ लाख ७१ हजार ९०५ जणांचा पहिला डोस घेऊन झाला असून, ३ लाख ६९ हजार १३९ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

काही दिवसांपूर्वी लसीकरणाला अत्यंत गर्दी होत होती आणि कोविन पोर्टलवरचं बुकिंग चार-पाच मिनिटांत फुल होत होतं. आता मात्र ही परिस्थिती पूर्णतः बदलली असून, कोविन पोर्टलवर केव्हाही पाहिलं, तरी स्लॉट सहज उपलब्ध असल्याचं चित्र गेल्या आठवड्यात पाहायला मिळालं. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग सहज शक्य होत आहे. शिवाय गावागावांतही लसीकरण होऊ लागलं आहे. त्यामुळे सर्वांनी शक्य त्या कोणत्याही मार्गाने लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply