सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ९ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे ३३ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय म्हणजेच उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या अद्यापही ५००च्या खाली आलेली नाही.
जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुबार लॅब तपासणी केलेल्या दोघांसह नवे ३३ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ७६३ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली ५, कुडाळ ८, मालवण ६, सावंतवाडी ८, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील १.
जिल्ह्यात सध्या ५५० सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ४६ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३२, दोडामार्ग २३, कणकवली १०३, कुडाळ १५३, मालवण १०४, सावंतवाडी ७३, वैभववाडी १०, वेंगुर्ले ५०, जिल्ह्याबाहेरील २.
साळगाव (ता. सावंतवाडी) येथील ६३ वर्षीय पुरुष आणि तळाशील (ता. मालवण) येथील ४० वर्षीय स्त्री अशा दोघांचा मृत्यू गेल्या २४ तासांत नोंदवला गेला. दोघांनाही सहव्याधी होत्या. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४४३ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७८, दोडामार्ग – ४२, कणकवली – २९७, कुडाळ – २४१, मालवण – २८७, सावंतवाडी – २००, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लसीकरण स्थिती
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ११ हजार ९० नागरिकांनी करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण ९ हजार ८३६ हेल्थ वर्कर्सनी पहिला डोस, तर ८ हजार ६८ जणांनी दुसरा डोस घेतला. ९ हजार ९१७ फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला डोस, तर ८ हजार ७२९ जणांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांवरील १ लाख २६ हजार ५५१ व्यक्तींनी पहिला डोस, तर ८१ हजार २६० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील १ लाख ४९ हजार २८ नागरिकांनी पहिला डोस, तर ९० हजार ६५० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील २ लाख १५ हजार ७५८ जणांनी पहिला डोस, तर ७९ हजार ४६९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ७ लाख ७९ हजार २६६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण ७ लाख ९८ हजार १८० लशी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये ६ लाख १४ हजार १८० लशी कोविशिल्ड, तर १ लाख ८४ हजार लशी कोवॅक्सिन होत्या. ६ लाख ५ हजार २७१ कोविशिल्ड आणि १ लाख ७३ हजार ९९५ कोवॅक्सिन असे मिळून ७ लाख ७९ हजार २६६ डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ६४ हजार ४९० लशी उपलब्ध असून, त्यापैकी ४९ हजार ४०० कोविशिल्ड आणि १५ हजार ९० कोवॅक्सिन आहेत. जिल्ह्यात सध्या ४१०० लशी शिल्लक असून, त्यापैकी ४०५० कोविशिल्ड आणि ५० कोवॅक्सिन लशींचा समावेश आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media