रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १६ ऑक्टोबर) करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले, तर ३७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज दोन रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या ३००च्या खाली आली आहे.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे १३ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ६१५ झाली आहे. आज ३७ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७५ हजार ८७९ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.५२ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ९९२ पैकी ९८२ अहवाल निगेटिव्ह, तर १० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ५२५ नमुन्यांपैकी ५२२ अहवाल निगेटिव्ह, तर ३ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ९७ हजार २९४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज २८३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १७९, तर लक्षणे असलेले १०४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १७३ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात ११० जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ६, डीसीएचसीमधील ४३, तर डीसीएचमध्ये ६१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ४३ जण ऑक्सिजनवर, २३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१२ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.७१ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४५३ एवढी आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२३, गुहागर १७२, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१६, रत्नागिरी ८१८, लांजा १२९, राजापूर १६२. (एकूण २४५३).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media