रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १८ ऑक्टोबर) करोनाचे नवे २२ रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. यापूर्वीच्या चार आणि आजच्या तीन अशा जिल्ह्यातल्या सात करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आज झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या आता २८९ आहे.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे २२ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ६८८ झाली आहे. आज २८ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७५ हजार ९३९ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.५१ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३६७ पैकी ३५८ अहवाल निगेटिव्ह, तर ९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ४६६ नमुन्यांपैकी ४५३ अहवाल निगेटिव्ह, तर १३ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ९९ हजार ८६२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज २८९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १७४, तर लक्षणे असलेले ११५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १६५ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात १२४ जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ९, डीसीएचसीमधील ४७, तर डीसीएचमध्ये ६८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ४७ जण ऑक्सिजनवर, १६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
यापूर्वीच्या चार आणि आजच्या तीन अशा सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.८७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर १.०४ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४६० झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२६, गुहागर १७२, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१७, रत्नागिरी ८२०, लांजा १२९, राजापूर १६३. (एकूण २४६०).
रत्नागिरी जिल्ह्यात उद्यासाठी (१९ ऑक्टोबर) उपलब्ध असलेल्या लसीकरण स्लॉटची माहिती
आज, १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६.१० वाजता को-विन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात खालील ठिकाणी उद्या (१९ ऑक्टोबर) लसीकरणाचे स्लॉट ऑनलाइन उपलब्ध आहेत. ज्यांचं लसीकरण व्हायचं आहे, त्यांना तातडीने https://www.cowin.gov.in/ पोर्टलवर जाऊन बुकिंग करून लस घेता येईल.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय – योगा हॉल
कोविशिल्ड लस (१८+ वयोगट)
पहिल्या डोससाठी ४८, दुसऱ्या डोससाठी ४४ लशी उपलब्ध
झाडगाव अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र, रत्नागिरी (UPHC 1)
कोविशिल्ड लस (१८+ वयोगट)
पहिल्या डोससाठी ४८, दुसऱ्या डोससाठी ४६ लशी उपलब्ध
कोकणनगर अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र, रत्नागिरी (UPHC 1)
कोविशिल्ड लस (१८+ वयोगट)
पहिल्या डोससाठी ४५, दुसऱ्या डोससाठी ३६ लशी उपलब्ध
चिपळूण अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC1)
कोविशिल्ड लस (१८+ वयोगट)
पहिल्या डोससाठी २००, दुसऱ्या डोससाठी १९९ लशी उपलब्ध
(टीप : स्लॉट बुकिंग सुरू असल्याने वर दिलेली आकडेवारी काही मिनिटांत बदलू शकते, याची कृपया नोंद घ्यावी.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड