रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २३ ऑक्टोबर) करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर २२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात आज एकाही करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या आता २२५ झाली आहे.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार, आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत नवे १८ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ८०४ झाली आहे. आज २२ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार १०७ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.५८ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५११ पैकी ५०१ अहवाल निगेटिव्ह, तर १० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ७४५ नमुन्यांपैकी ७३७ अहवाल निगेटिव्ह, तर ८ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ९७ हजार ८७९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज २२५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले १२३, तर लक्षणे असलेले १०२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १११ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात ११४ जण आहेत. आज चार रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली आहे. तसेच, १७ रुग्णांची नावे डुप्लिकेट एंट्री असल्यामुळे कोविड-१९ पोर्टलवरून काढून टाकण्यात आली आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले १२, डीसीएचसीमधील ४३, तर डीसीएचमध्ये ५९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ४५ जण ऑक्सिजनवर, १६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४.८७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१३ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४६८ आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२६, गुहागर १७२, चिपळूण ४७६, संगमेश्वर २१८, रत्नागिरी ८२३, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४६८).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media