सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या ४८

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (७ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार आज नवा एक रुग्ण आढळला. एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. तसेच एकाही मृत्यूची नोंद आज झाली नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या ४८ सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ४८ रुग्णांपैकी २ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९, दोडामार्ग १, कणकवली ७, कुडाळ ११, मालवण १०, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले ५, जिल्ह्याबाहेरील ०.

गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. मात्र त्याआधी एका रुग्णाचा मृत्यू नोंदवला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५९ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०४, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply