सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (८ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार आज नवे तीन रुग्ण आढळले. नऊ रुग्ण करोनामुक्त झाले. एकाही मृत्यूची नोंद आज झाली नाही.
जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या ४२ सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ४२ रुग्णांपैकी १ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग १, कणकवली ४, कुडाळ १२, मालवण १०, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले ५, जिल्ह्याबाहेरील ०.
गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५९ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०४, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड