सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १४६ रुग्ण आढळले. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या एक हजार ४०४ झाली आहे.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (१८ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या पाच जणांसह एकूण १४६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या १,४०४ झाली आहे. त्यापैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर असून ४ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.
आतापर्यंत ५४ हजार ९६९ रुग्ण बाधित जिल्ह्यात आढळले, तर ५२ हजार ९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ हजार ४७१ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७, दोडामार्ग ३८, कणकवली २३, कुडाळ १९, मालवण ९, सावंतवाडी २८, वैभववाडी १०, वेंगुर्ले ०७, जिल्ह्याबाहेरील २.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ८७, दोडामार्ग १८३, कणकवली २५३, कुडाळ ३२४, मालवण १६६, सावंतवाडी १९३, वैभववाडी ४८, वेंगुर्ले १२१, जिल्ह्याबाहेरील २३.
मु. पो. कणकवली येथील ७३ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४७१ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०१, कुडाळ – २४४, मालवण – २९०, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media