रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या ३०० वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १८ जानेवारी) करोनाचे नवे ३०४ रुग्ण आढळले, तर १९५ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,१७४ झाली आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८१ हजार ६८३ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७७ हजार ९६९ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.४५ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ७२६ पैकी ५९३ निगेटिव्ह, तर १३३ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १०७८ पैकी ९०७ नमुने निगेटिव्ह, तर १७१ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ८४ हजार ३६० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ११७४ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ९५९, तर लक्षणे असलेले २१५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ९४६ असून, संस्थात्मक विलगीकरणात २२८ जण आहेत. शिवाय ४५ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १०९, तर डीसीएचमध्ये १०६ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये १३ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात पाच रुग्ण दाखल आहेत.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९५ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०५ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७५, चिपळूण ४८१, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३१, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९५).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची १०४ सत्रे पार पडली. त्यात १,१४९ जणांनी लशीचा पहिला, तर ४,८७७ जणांनी दुसरा डोस घेतला. १७ जानेवारीला १८ वर्षांवरच्या एकूण ६,०२६ जणांचे लसीकरण झाले, तर १५ ते १७ वयोगाटातील १,०२८ जणांचे लसीकरण काल झाले. शिवाय ६०४ जणांनी वर्धक मात्रा घेतली. १७ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४१ हजार ६३५ जणांचा पहिला, तर ७ लाख ८५ हजार ९१४ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply