hand holding petri dish

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ६२ रुग्ण, २६५ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ६२ रुग्ण आढळले. कालच्या तुलनेत नव्या रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट झाली. आज २६५ रुग्ण करोनामुक्त झाले, तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. २५ जानेवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ५४ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या ८ जणांसह एकूण ६२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १,३३७ रुग्णांपैकी १९ रुग्ण ऑक्सिजनवर असून ४ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज २६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार १६० रुग्ण बाधित आढळले, तर ५३ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४८० झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १२, दोडामार्ग ०, कणकवली ५, कुडाळ २०, मालवण ६, सावंतवाडी १४, वैभववाडी ०, वेंगुर्ले ५, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १०१, दोडामार्ग ४५, कणकवली १८९, कुडाळ ३३८, मालवण ९७, सावंतवाडी २७४, वैभववाडी ६६, वेंगुर्ले १४२, जिल्ह्याबाहेरील १७.

आज वारंगांची तुळसुली (ता. कुडाळ) येथील ८५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना मूत्रपिंडाचा विकार होता. या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४८० झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८१, दोडामार्ग – ४५, कणकवली – ३०२, कुडाळ – २४८, मालवण – २९२, सावंतवाडी – २०८, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply