person holding covid sign

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ४८ रुग्ण, १५९ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ४८ रुग्ण आढळले, तर तिपटीहून अधिक म्हणजे १५९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार आज (दि. १ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात ४६ तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या २ जणांसह एकूण ४८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९७७ रुग्णांपैकी १७ रुग्ण ऑक्सिजनवर असून ८ रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. आज १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ९२२ रुग्ण बाधित आढळले, तर ५४ हजार ४४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज दोघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४९८ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग १४, कणकवली ४, कुडाळ ८, मालवण १०, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील १.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ८९, दोडामार्ग ५९, कणकवली ८२, कुडाळ २७१, मालवण १०६, सावंतवाडी १६८, वैभववाडी ४२, वेंगुर्ले १३८, जिल्ह्याबाहेरील २२.

आज ओसरगाव (ता. कणकवली) येथील एका ७५ वर्षीय पुरुष रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्या रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. याशिवाय कणकवली तालुक्यात आधी मरण पावलेल्या एका रुग्णाची नोंद आज झाली. या दोन मृत्यूंमुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १,४९८ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८२, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३०८, कुडाळ – २५०, मालवण – २९६, सावंतवाडी – २११, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply