रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ८० रुग्ण, १०४ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १ फेब्रुवारी) करोनाचे नवे ८० रुग्ण आढळले, तर १०४ रुग्ण करोनामुक्त झाले. पूर्वीच्या दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८३ हजार ८५५ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ८० हजार ४२४ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९५.९१ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २९१ पैकी २५१ निगेटिव्ह, तर ४० पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ८१७ पैकी ७७७ नमुने निगेटिव्ह, तर ४० पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २ हजार ८१४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ८९७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ६३०, तर लक्षणे असलेले २६७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५६१ असून, संस्थात्मक विलगीकरणात ३३६ जण आहेत. एकूण १९ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १४३, तर डीसीएचमध्ये १२४ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ६९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी २६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात १५ रुग्ण दाखल आहेत.

यापूर्वी मरण पावलेल्या गुहागर आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५१५ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.०४ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. यापूर्वीचा मृत्यू आज नोंदविला गेल्याने आजचा मृत्युदर ० टक्के दर्शविण्यात आला आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १७८, चिपळूण ४८८, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३४, लांजा १३१, राजापूर १६६. (एकूण २,५१५).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ७० सत्रे पार पडली. त्यात ३३५ जणांनी लशीचा पहिला, तर २,१८८ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २,५२३ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील १३७, तर ३९६ जणांनी बूस्टर डोस घेतले. ३१ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४७ हजार ८२५ जणांचा पहिला, तर ८ लाख २० हजार ४४९ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply