सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे ६ नवे रुग्ण; १८ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ६ रुग्ण आढळले, तर १८ रुग्ण करोनामुक्त झाले, असे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात म्हटले आहे. आज (दि. १९ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १९८ रुग्णांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नसून, एकही रुग्ण चिंताजनक अवस्थेत नाही.

आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ३१२ रुग्ण बाधित आढळले, तर ५५ हजार ५८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत मरण पावलेल्या रुग्णांची संख्या १५२५ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ०, कणकवली ०, कुडाळ २, मालवण १, सावंतवाडी २, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०, जिल्ह्याबाहेरील ०.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १०, दोडामार्ग ७, कणकवली ७, कुडाळ ६१, मालवण ४५, सावंतवाडी २१, वैभववाडी ४, वेंगुर्ले ३७, जिल्ह्याबाहेरील ६.

जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १५२५ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८५, दोडामार्ग – ४६, कणकवली – ३१८, कुडाळ – २५४, मालवण – २९९, सावंतवाडी – २१५, वैभववाडी – ८३, वेंगुर्ले – ११६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply