रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १९ फेब्रुवारी) १० नवे रुग्ण आढळले, तर २६ रुग्ण करोनामुक्त झाले. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या १२७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ४१, तर लक्षणे असलेले ८६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ४१, तर संस्थात्मक विलगीकरणात ८६ जण आहेत. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ३७७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ६८३ म्हणजे ९६.८१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २०९ पैकी २०५ निगेटिव्ह, तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४८८ पैकी ४८२ नमुने निगेटिव्ह, तर ६ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २० हजार ७०५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. ३५ जणांची नोंद पोर्टलवर होणे बाकी आहे.
अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ७६, तर डीसीएचमध्ये १० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण उपचारांखाली नाही. बाधितांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नसून, अतिदक्षता विभागात १ रुग्ण दाखल आहे.
मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २५३२ आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.७१ टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८१, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२८, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर १६७. (एकूण २५३२).
जिल्ह्यातील लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात १८ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५९ सत्रे पार पडली. त्यात १६७ जणांनी लशीचा पहिला, तर १९९७ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २१६४ जणांचे लसीकरण १८ फेब्रुवारीला झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ८६८ जणांनी १८ फेब्रुवारीला लस घेतली, तर २३८ जणांनी बूस्टर डोस घेतला. १८ फेब्रुवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५१ हजार ३५८ जणांचा पहिला, तर ८ लाख ४९ हजार ६९३ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १९ लाख १ हजार ५१ जणांचे लसीकरण झाले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media