पितृपक्षानिमित्त सिंधुदुर्गातील दिविजा वृद्धाश्रमाला मदत करण्याचे आवाहन

निकेत पावसकर, कणकवली :
‘पितृपंधरवड्यात पितरांचे स्मरण केले जाते. त्या निमित्ताने दिविजा वृद्धाश्रमातील गरजू आजी-आजोबांना अन्नदान करून आपल्या पितरांचे स्मरण करावे. गरजवंतांना अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करून वेगळा पायंडा पाडावा,’ असे आवाहन असलदे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून करण्यात आले आहे.

उपेक्षित गरीब, गरजू, अपंग व्यक्तींकरिता कार्य करणारी स्वस्तिक फाउंडेशन ही कोकणातील अग्रेसर संस्था आहे. असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम हा स्वस्तिक फाउंडेशन या संस्थेचा मुख्य उपक्रम असून, त्यात ४५ निराधार ज्येष्ठ नागरिक उपचारात्मक पुनर्वसनाची सेवा घेत आहेत. सद्यस्थितीत दिविजा वृद्धाश्रमात २४ महिला व २१ पुरुष उपचारात्मक सेवा घेत आहेत. अशा या आजी-आजोबांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवते.

कौटुंबिक प्रवाहातून बाहेर पडलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी संस्था आपले धार्मिक सण मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करते. गुढीपाडवा, आषाढी एकादशी, रक्षाबंधन, गोपाळकाला, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, तुलसीविवाह, त्याबरोबर मार्गशीर्षात सत्यनारायण पूजा, मकरसंक्रांत, होळी इत्यादी सणसमारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आनंदाने साजरे केले जातात. 

दिविजा वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी अद्ययावत ग्रंथालय, मनोरंजनाची साधने, कॅरम आदी उपलब्ध असून, ऑनलाइन योग सेशन्सही आयोजित केली जातात. सद्यस्थितीत आश्रमात जागेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे नवीन अद्ययावत वास्तू उभारण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींकडे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. सजग नागरिकांकडून येणाऱ्या मदतीतून आधुनिक स्वरूपाचा आश्रम उभारण्यात येणार आहे. 

दानशूर व्यक्तींनी वृद्धाश्रमास सढळ हस्ते मदत करून आश्रमाच्या पुनर्बांधणीसाठी हातभार लावावा. वर्षभर केव्हाही मदत करता येतेच; मात्र पितृपंधरवड्याला वेगळे महत्त्व असल्याने त्या निमित्ताने वृद्धाश्रमाला मदत करून पितरांच्या स्मरणाबरोबरच वृद्धांच्या सेवेला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही इच्छुक व्यक्ती प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, अन्नदानाच्या स्वरूपात किंवा आर्थिक मदत देऊन आश्रमाला मदत करू शकते.

संपर्क :
संदेश शेट्ये : 9223221400  
दीपिका रांबाडे :  8530700102 
अविनाश फाटक : 9820218269  
अस्मि राणे : 8080071626

मदतीसाठी बँक खात्याचा तपशील

Name : Swastik Foundation 
Account No. : 62483160440
Bank name : State Bank of India
IFSC code : SBIN0015445
Branch : Prabhadevi, Mumbai

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply