संगमेश्वरमधील सायक्लोथॉनच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : येथील सुवर्णसूर्य फाऊंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कलांगण संगमेश्वर आयोजित संगमेश्वर ते देवळे सायक्लोथॉनच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ही सायक्लोथॉन ५ मार्च रोजी होणार आहे.

कोकणातील प्रचलित नसलेली पर्यटनस्थळे जागतिक पटलावर पोहोचावीत, यासाठी गेली तीन वर्षे सुवर्णसूर्य फाऊंडेशन सायक्लोथॉन आयोजित करते. सन २०२१ मध्ये पेडल डेली स्टे फीट हे घोषवाक्य घेऊन ही सायक्लोथॉन हेदवी ते गणपतीपुळे दरम्यान पार पडली. गेल्या वर्षी कातळशिल्पांचा प्रसार-प्रचार व्हावा, या उद्देशाने थिबा राजवाडा ते देऊड कातळशिल्प अशी ही सायक्लोथॉन घेण्यात आली. पेडल फॉर पेट्रोग्लिफ हे या सायक्लोथॉनचे घोषवाक्य होते.

यावर्षी संगमेश्वर ते देवळे अशी सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे. गुजरातमध्ये दत्तसंप्रदायाचा प्रसार-प्रचार करणाऱ्या रंगावधूत स्वामींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाचे औचित्य साधून येत्या ५ मार्च रोजी होणाऱ्या या सायक्लोथॉनचे पेडल फॉर स्पिरिच्युअलिटी हे घोषवाक्य आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, कराड, सिंधुदुर्ग, खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी येथील सायकलिस्टनी सायक्लोथॉनसाठी नावनोंदणी केली आहे. त्यासाठी असलेल्या नोंदणी शुल्कात आदल्या दिवशी राहणे, रात्रीचे जेवण, सकाळचा अल्पोपाहार, स्पर्धेदरम्यान हायड्रेशन पॉइट, व्हेइकल सपोर्ट, मेडिकल सपोर्ट, प्रत्येक सहभागीला पदक तसेच सायक्लोथॉन संपल्यावर प्रत्येकाची अल्पोपाहाराची व्यवस्था आहे. जास्तीतजास्त सायकलप्रेमींनी नावनोंदणी करावी, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी, कलांगण संगमेश्वरचे श्रीनिवास पेंडसे तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे दर्शन जाधव, योगेश मोरे यांनी केले आहे.

नावनोंदणीसाठी लिंक : http://bit.ly/3YUdyPm

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply