नरवीर तानाजी – सूर्याजी मालुसरेंच्या साखर गावात शिवजन्मोत्सव

पोलादपूर : शिवरायांच्या शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या पोलादपूर तालुक्यातील सुभेदार नरवीर तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज असलेल्या साखर गावात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात स्वराज्य युवा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.

उमरठ येथील सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीस्थळावरून साखर येथील सूर्याजी मालुसरे यांच्या समाधीपर्यंत शेकडो तरुणांच्या उपस्थितीत पहाटे शिवज्योत आणण्यात आली. त्यानंतर सुप्रसिद्ध शिवचरित्रकार आणि कीर्तनकार हभप डॉ. प्रवीण महाराज दुशिंग पाटील (औरंगाबाद) यांचे शिवकाऱ्याचाच वेध घेणारे वीररसपूर्ण कीर्तन झाले. आजची तरुण पिढी बिघडली असल्याची खंत अलीकडे समाजात व्यक्त केली जाते, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरी होणारी शिवजयंती तरुणच साजरी करतात, त्याचबरोबर देशाची सीमांचे संरक्षण करणारे तरुणच आहेत. मात्र आईवडील संस्कार करण्यात कमी पडत आहेत. शिक्षण घेण्याच्या अन् देण्याच्या पद्धतीत बदल झाला असला तरी महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाचे बाळकडू त्यांना सतत पाजत जा, असे आवाहन कीर्तनातून प्रवीण महाराजांनी केले.

कीर्तनाला स्वरगंधर्व कैलास महाराज पवार, गायनसम्राट संजय महाराज हजारे, रायगडभूषण पखवाज वादक सुनील मेस्त्री, विठ्ठल मांढरे, जयराम चोरगे, अनिल दाभेकर, आनंद घाडगे यांनी साथ दिली.

याप्रसंगी श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे गुरुवर्य हभप रामदादा घाडगे, पोलादपूरचे माजी सभापती नारायण अहिरे, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश कोळसकर या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते ज्ञानोबा मालुसरे, विनायक मालुसरे, सरपंच पांडुरंग सुतार, प्रमुख संयोजक पांडुरंग शं. मालुसरे, विनायक ज. बांद्रे, पोलादपूर शिवसेना नेते आणि ज्येष्ठ सामाजिक नेते कृष्णा कदम के के, भरत चोरगे, दीपेश मालुसरे, जयराम बांद्रे, दगडू शं. मालुसरे, संतोष तु. मालुसरे, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र मालुसरे, सुनील बांद्रे, नारायण चोरगे, रूपेश सोनाटे, संदीप मालुसरे, राकेश चोरगे, नितेश ल मालुसरे, वैभव सोनाटे उपस्थित होते. प्रस्ताविक पोलादपूर शिवसेना तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, तर सूत्रसंचालन नारायण चोरगे गुरुजी यांनी केले. पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply