आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीकर रंगले अभंगरंगांत…

रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकारांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला (२८ जून २०२३) ‘अभंगवाणी’ हा अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुसळधार पावसाच्या सोबतीने रत्नागिरीकर रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (कार्यक्रमाचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिला आहे.)

सुप्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली होती. या कार्यक्रमात आनंद पाटणकर, श्वेता जोगळेकर, संध्या सुर्वे, करुणा पटवर्धन, तन्वी मोरे, अभिजित भट, इरा गोखले यांनी गायन केलं. सुरुवातीला कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सर्व कलाकारांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. ‘सुंदर ते ध्यान’ या विठूरायाच्या रुपावलीने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर नाम गाऊ, संतांचिया गावी, आषाढीला जमतो भक्तांचा हा मेळा, राजस सुकुमार, मिळे आवडीचे सुख, वृंदावनी वेणू, आधी रचिली, सगुण संपन्न पंढरीच्या राया, अवघाचि संसार सुखाचा करीन, काळ देहासी… आदी बहारदार गीते सादर झाली. मध्यंतरात इरा गोखले या बालगायिकेने ‘रखुमाई रखुमाई’ हे गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. ‘अच्युता अनंता’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

मैफलीत विजय रानडे, चैतन्य पटवर्धन (संवादिनी), विलास हर्षे, श्रीरंग जोगळेकर (ऑर्गन), उदय गोखले (व्हायोलिन), हेरंब जोगळेकर, केदार लिंगायत, संजू बर्वे (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज), मंगेश मोरे (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली. अद्वैत मोरे आणि राघव पटवर्धन या बालकलाकारांनी तालवाद्याची साथ केली. राजू जोशी यांचे नेटके निवेदन आणि एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत यांचे उत्तम ध्वनिसंयोजन यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply