जनसेवा ग्रंथालयातर्फे रत्नागिरी तालुकास्तर वक्तृत्व स्पर्धा

रत्नागिरी : येथील जनसेवा ग्रंथालयाने रत्नागिरी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. महाविद्यालयीन आणि खुला अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे.

साहित्य आणि वाचन चळवळ वाढीस लागावी, या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयीन गटासाठी विषय असे : आर्टिफिशियल इंटेलिजन्स : शाप की वरदान?, ध्येयनिष्ठा आणि ध्येयपूर्ती, कोकण विकासाची ‘ब्लू प्रिन्ट’ आणि दीड जीबी डेटा.. का आयुष्य वाया घालवतो बेटा… खुल्या गटासाठी कोकण विकासाची ‘ब्लू प्रिन्ट’, शस्त्र की शास्त्र..?, ज्ञानतपस्वी : रघुनाथ माशेलकर किंवा भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि तरुण पिढी.

स्पर्धेसाठी ५० रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येणार आहे. ते नावनोंदणीवेळी जमा करावे. येत्या २५ सप्टेंबरपर्यंत स्पर्धकाची नावनोंदणी होणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव प्रवेशशुल्क परत दिले जाणार नाही. स्पर्धेचा दिनांक, ठिकाण, वेळ नंतर कळविला जाईल. स्पर्धकाने स्वखर्चाने स्पर्धेला यायचे आहे. महाविद्यालयीन स्पर्धकाला बोलण्यासाठी पाच अधिक दोन मिनिटे तर खुल्या गटासाठी सात अधिक दोन मिनिटे इतका वेळ देण्यात येईल. पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र, पुस्तकभेट देण्यात येईल. अधिक माहितीसाठी व प्रवेशशुल्क तसेच नावनोंदणीसाठी ओंकार मुळे (9420458878) यांच्याशी संपर्क साधावा, असे जनसेवा ग्रंथालयातर्फे कळविण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply