लांजा : भांबेड (ता. लांजा) येथील अमोल रंगयात्री संस्थेचे अध्यक्ष कलावंत अमोल रेडीज यांना राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाशी संलग्न असलेल्या बुलडाणा फिल्म सोसायटीतर्फे हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने देशाच्या नावलौकिकासाठी, विकासकार्यासाठी कलासंस्कृतीचा एक भाग म्हणून चित्रपट क्षेत्रातील श्री. रेडीज यांच्या योगदानाकरिता राष्ट्रीय कला गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. पुरस्कार वितरण ७ एप्रिल रोजी बुलडाणा येथील पत्रकार भवनात होणार आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

