आले रामराज्य…..! (भाग ७)

राममंदिर ते राष्ट्रमंदिर

येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत “आले रामराज्य” या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव होणार आहे. त्यानिमित्ताने लिहिलेल्या लेखमालेचा अखेरचा लेख.

नमस्कार, जय श्रीराम!

महर्षी वाल्मीकींनी रामायणाची रचना केल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना आशीर्वाद दिला होता की जोपर्यंत पृथ्वीवर नद्या वाहत आहेत, जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत स्थिर आहेत, तोवर रामकथा सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध राहील. युगानुयुगे उलटली, पिढ्या बदलल्या, अभिव्यक्तीची माध्यमे आधुनिक झाली, पण रामायणाची, रामकथेची गोडी किंचितमात्रही कमी झालेली नाही.

श्रीरामांना भारतीयांनी आराध्य दैवत मानले. भारताच्या इतिहासात राम आहे, भारताच्या संस्कृतीत राम आहृ, आपल्या तत्त्वज्ञानात राम आहे. आपल्या आचार-विचारात राम आहे, किंबहुना ज्यामध्ये राम नाही, त्यामध्ये काही नाही, अशी आपली धारणा आहे. इतकेच नाही तर आपल्या मनोरंजनातही राम आहे. जो मनाला रमवतो तो राम अशी सोपी व्याख्या केली आहे. हलाहलाने उद्विग्न शिवांना रामनामाने शांतता मिळाली, एवढे रामनामाचे माहात्म्य आहे. कलियुगात संसारातील विविध तापाने त्रस्त झालेले लोक मन रमवायला रामांचाच आश्रय घेतात.

समर्थ रामदास स्वामी म्हणाले – “राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा”. कुणी रामनाम जपतो, कुणी रामधून गातो, कथा, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, नाटक, सिनेमा, कथा, कविता, कादंबरी या सर्वांच्या माध्यमातून आपण रामकथेचा आस्वाद घेत असतो. रामराज्य हा शब्द आपण जितका सहज वापरतो तितका त्याचा अर्थ मात्र सहजसाध्य नाही.

प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राजा
हेच तत्त्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची

ही भावना मनात ठेवून जेव्हा राज्यशकट हाकला जातो, ते रामराज्य आहे.

हनुमंताने श्रीरामांकडून वर मागून घेतला –
असंख्य वदने, असंख्य भाषा
सकलांची मज एकच आशा
श्रीरामांचा चरित्र गौरव त्यांनी सांगावा

आज रामांचा चरित्रगौरव सांगितला जात आहे, इतकेच नव्हे तर रामांना अभिप्रेत आचारविचारांनी भारतीयांच्या मन:पटलावर रामप्रतिमा कोरण्याचे कार्य होत आहे. शेकडो वर्षांच्या संघर्षांनंतर अयोध्येतील राममंदिर पूर्णत्वास गेले आहे. रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली आहे आणि या सर्व सुंदर पार्श्वभूमीवर कीर्तनसंध्याने “आले रामराज्य…” म्हणून रामकथेचे आयोजन केले आहे. आले रामराज्य … राममंदिर ते राष्ट्रमंदिर …राममंदिरापासून ते अवघे राष्ट्र हेच मंदिर व्हावे हा प्रवास सगळ्या भारतीयांना करायचा आहे. तो यशस्वी व्हावा यासाठी प्रभू रामचंद्रांचेच आशीर्वाद हवेत. आपण सर्वजण आपापल्या परीने सेवा करत राहू, श्रीराम आपल्याला नक्की आशीर्वाद देतील, ही खात्री बाळगू या.

मित्रांनो, गेल्या ७ भागांमधून कीर्तनसंध्या २०२४ च्या निमित्ताने काही विषय आपल्यासमोर ठेवण्याचा माझ्या अल्पमतीने एक छोटासा प्रयत्न केला. यामध्ये जे चांगले झाले असेल ती रामरायांची कृपा, जे न्यून राहिले असेल त्यासाठी आपली क्षमा मागतो. माझ्यावर मातृ-पितृवत प्रेम करणारे आपण सर्वजण त्यासाठी मला नक्की क्षमा कराल या खात्रीने झालेली सेवा रामरायांच्या चरणी अर्पण करून या लेखमालेतून आपला निरोप घेतो. उद्यापासून, ९ मार्चपासून रोज सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीच्या प्रमोद महाजन संकुलात भेटू या कीर्तनसंध्या २०२४ मध्ये.

खूप खूप धन्यवाद.
नमस्कार
(समाप्त)

  • निबंध कानिटकर, संगमेश्वर
    (संपर्क : ९४२२३७६३२७)
  • ……

प्रवेशिकांविषयी …

कीर्तनसंध्येसाठी भारतीय बैठक मोफत असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील.
कीर्तनसंध्या २०२४ देणगी सन्मानिका मिळण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे

मानस जनरल स्टोअर्स, माळनाका, रत्नागिरी
९०११६६२२२०

धन्वंतरी आयुर्वेदिक औषधालय, मारुती, मंदिर, रत्नागिरी
उमेश आंबर्डेकर – ९४२३२९२४३७

सोहम एन्टरप्रायझेस, माळनाका, रत्नागिरी
नितीन नाफड – ८३०८८१३१५८

गुरुकृपा रेडिओ हाउस, टिळक आळी, रत्नागिरी
९८९०८२७००६

आगाशे स्टोअर्स आणि आगाशे फूडकोर्ट, साळवी स्टॉप, रत्नागिरी
९७३०३१०७९९

श्रीकांत सरदेसाई, रत्नागिरी
९४२११४२४९८

श्रीराम गोडबोले, पावस
९४२१२३८८२४

मकरंद करंदीकर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी
९२८४७६७३७६

रत्नाकर जोशी, डिक्सन सप्लायर्स, जिल्हा परिषद बस स्टॉपजवळ,
मेन रोड, रत्नागिरी
९४२२०५२६१३

अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपी, श्रीनगर, खेडशी, रत्नागिरी
अनिकेत कोनकर – ९४२३२९२१६२

महेंद्र दांडेकर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी
७४१०१०४४३३

पराग गोगटे, केशर अमृततुल्य, जयस्तंभ, रत्नागिरी
९५५२५७०७२४

केळकर उपाहारगृह, अंगण प्लाझा, नाचणे रोड
९४२३०४७३४७

मधुसूदन बेंडे
९४२३८१७५११

राजन पटवर्धन, विष्णुनगर, नाचणे रोड, रत्नागिरी
९८६०३६६९९१

गंधराज ,समीर कार्लेकर, मारुती आळी, रत्नागिरी
९७६९२८७१७१

चिन्मय भागवत, नाचणे, रत्नागिरी
८८८८७९८८४५

श्रीनंदन केळकर, पऱ्ह्याची आळी, रत्नागिरी
७०८३९०९१०९

निबंध कानिटकर, कसबा, संगमेश्वर
९४२२३७६३२७

ओमकार बापट, रत्नागिरी
९४२२४३२७६४

…….
याशिवाय समर्पण अॅपवरूनही प्रवेशिका उपलब्ध आहेत. समर्पण अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक –

https://scan.samarpanpay.com/home/kirtansandhyaratnagiri

सोबतचा कोड स्कॅन करूनही देणगी प्रवेशिका उपलब्ध होऊ शकेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply