१४ एप्रिलला कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे वसंतोत्सव स्नेहमेळावा

रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे दर वर्षीप्रमाणे वसंतोत्सव/गुढीपाडवा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १४ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता नाचणे येथील श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी श्री गणेशपूजा, चैत्रगौरीची पूजा होणार आहे. त्यानंतर सन्मान सोहळा होणार असून, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन आणि अध्यक्षीय भाषण होईल. चैत्रगौरीचे हळदी-कुंकूदेखील या वेळी होणार असून, विविध गुणदर्शन कार्यक्रमही होणार आहेत.

परस्पर परिचय वाढवण्यासाठी आणि स्नेहवृद्धीसाठी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनंत आगाशे आणि कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply