रत्नागिरी : येथील राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत सुमित कदम याने मानाचा राधाकृष्ण श्री २०२४ चा किताब पटकावला.
वैश्ययुवा, रत्नागिरी संस्थेच्या माध्यमातून राधाकृष्ण श्री २०२४ ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक नामवंत स्पर्धक सहभागी झाले होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सुमित कदमने बाजी मारली. हर्षद मांडवकर बेस्ट पोझर आणि फैय्याज मुल्ला याला उगवता तारा म्हणून गौरवण्यात आले. स्पर्धा रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आली.
स्पर्धा चार गटांत घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन विकास मलुष्टे, जयप्रकाश गांधी, रवींद्र प्रसादे, श्रीनाथ खेडेकर, प्रवीणशेठ मलुष्टे, लाल्याशेठ खातू, विकास खातू, जयु गांधी, रवींद्र प्रसादे, प्रवीण मलुष्टे, जितेंद्र नाचणकर, सिद्धार्थ बेनखे, वसंत भिंगार्डे, मकरंद खातू, वीरेंद्र वणजू, सौरभ मलुष्टे, गौतम बाष्टे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
पहिल्या १६२ सेंटिमीटर उंचीच्या गटात महेश आंबेकर, आतिश विचारे, ओमकार कीर, प्रणय चोरगे, आणि प्रणव कांबळी यांनी पहिले पाच क्रमांक पटकावले. १६२ सेंटिमीटर पुढील ते १६७ सेंटिमीटर उंचीपर्यंतच्या दुसऱ्या गटात स्वप्नील घाटकर, हर्षद मांडवकर, सुयोग पदमुळे, वैभव पाटील आणि संजय डेरवणकर यांनी गुणानुक्रमे यश मिळविले.
१६७ सेंटिमीटर उंचीपुढील ते १७२ सेंटिमीटर उंचीपर्यंतच्या तिसऱ्या गटात सुमित कदम, गणेश गोसावी, अभिनंदन सातोपे, अमित जाधव आणि वरद झेपले पहिल्या पाच क्रमांकांनी यशस्वी ठरले. १७२ सेंटिमीटर उंचीपुढील पाचव्या गटात फैजान मुल्ला, आशिष घाणेकर, समीर शिंदे आणि शिवम कोकरे यांनी क्रमांक पटकावले.
सुमित कदम या स्पर्धेचा विजेता ठरला. स्पर्धेतील किताब विजेत्याला अभिज्ञ वणजू यांच्या हस्ते मानाचा पट्टा प्रदान करण्यात आला. तसेच आकर्षक शिल्ड व रोख पारितोषिक राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू यांच्या हस्ते देण्यात आले.
बक्षीस वितरणावेळी मकरंद खातू, अथर्व शेट्ये, मुकुल मलुष्टे, सौरभ मलुष्टे, सचिन केसरकर, मनोहर दळी, कुंतल खातू, साहिल रेडीज, प्रज्ञेश रेडीज, ऋषी धुंदूर, सदानंद जोशी, जितेंद्र नाचणकर, शैलेश जाधव, नरेंद्र वणजू, वेदांत मलुष्टे, समीर रेडीज, राजू गांगण, हर्षद रेडीज, फैयाज खतीब उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम बाष्टे यांनी केले. हेमंत वणजू यांनी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. यावेळी रत्नागिरीतील ज्येष्ठ व्यायामपटू भाई विलणकर यांचा ८० व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विशेष सत्कार वैश्य युवातर्फे विकास मलुष्टे व जयप्रकाश गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी भाईंनी त्यांचा जीवनप्रवास सगळ्यांसमोर मांडला.
Follow Kokan Media on Social Media

