रत्नागिरी : रत्नागिरीच्या अनबॉक्स युअर डिझायर ॲपला ८ जून रोजी पाच वर्षे पूर्ण होऊन सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने ग्राहकांसाठी व सर्व रसिकांसाठी गाती सुरेल तारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अनबॉक्स ॲपचे गौरांग आगाशे ॲपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. प्लास्टिक कचरा संकलन, ई-कचरा संकलन तसेच समाजातील विविध कारागिरांना एकत्रित प्लॅटफॉर्म देणे आदी उपक्रम ते राबवत आहेत.
अनबॉक्स ॲपच्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी व सर्व रसिकांसाठी गाती सुरेल तारा कार्यक्रमाचे आयोजन ८ जून २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. रत्नागिरीतील व्हायोलिन वादक उदय गोखले यांची संकल्पना असलेला गाती सुरेल तारा हा कार्यक्रम असून दोन ते अडीच तासाच्या या कार्यक्रमात व्हायोलिन या वाद्यावर विविध हिंदी-मराठी जुन्या नव्या गाण्यांचा आनंद रसिक प्रेक्षक घेऊ शकणार आहेत.
पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटल स्वरूपाच्या असलेल्या या कार्यक्रमात व्हायोलिनवादन उदय गोखले, कीबोर्डसाथ राजन किल्लेकर, विनय चेउलकर, तबलासाथ सचिन भावे, बेस गिटार शैलेश गोवेकर, अकॉस्टिक गिटार गणेश साळोखे, हँडसोनिक किरण ठाणेदार, सुसंवादक निबंध कानिटकर असे कलाकार कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे ध्वनिसंयोजन एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गौरांग आगाशे यांनी केले आहे.
अनबॉक्सचा नवा उपक्रम
दरम्यान, वर्धापन दिनानिमित्ताने अनबॉक्सतर्फे नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरीत रोजगारांची निर्मिती होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असणे अत्यंत गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहे. रोजगार संधी मिळण्याबरोबरच ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना ते व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मदत होऊ शकते. आयटीआय, पॉलिटेक्निक किंवा अशा अनेक स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधून तरुण युवक चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन बाहेर पडतात. पण रोजगार आणि त्यांच्या सेवांची गरज असलेल्या ग्राहकांचा समन्वय साधण्यासाठी एकही प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही. तो उपलब्ध झाला तर घरबसल्या लोकांना अनेक सेवा खात्रीशीर आणि वेळेमध्ये मिळू शकतात. गेली दोन वर्षे या प्रकल्पावर काम चालू केल्यानंतर त्यामध्ये रिक्षा ही अत्यंत लोकांना गरजेच्या असलेली सेवासुद्धा आम्ही उपलब्ध केल्या आहेत. ट्रॅव्हल विथ शेअर ही सेवासुद्धा त्यामध्ये उपलब्ध आहे. नव्या गोष्टी आणल्यामुळे जुन्या गोष्टी विकायच्या असतील, तर त्यासाठी रिसेल प्रॉडक्ट सेवा त्यात आहे. जॉब व्हेकन्सीजअंतर्गत उपलब्ध नोकऱ्यांची माहिती दिली जाईल. रत्नागिरी शहरातल्या शहरात कुरियर सेवा दिली जाईल. याशिवाय एसी रिपेअरिंग इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फर्निचर, वॉशिंग मशीन सर्व्हिस, होम क्लिनिंग, पौरोहित्य, होम क्लीनिंग,सलून, ड्रायव्हर मिळणे, गाडी भाड्याने मिळणे, फॅब्रिकेशन, म्युझिशियन, इव्हेंट मॅनेजमेंट, साउंड सिस्टीम, लाइटिंग अशा विविध सेवा रत्नागिरीकरांना देण्याचा प्रयत्न आहे. आयत्या वेळच्या अनेक सेवाही देण्यात येणार आहेत. अनबॉक्स साथी हा टॅब उपलब्ध आहे. त्यामध्ये महत्त्वाचे फोन नंबर यले पेजीसच्या धर्तीवर लोकांना मोफत दिले जाणार आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व संपर्क क्रमांक लोकांना उपलब्ध राहतील.
खात्रीशीर ,प्रामाणिक व सुरक्षित सेवा देणारे ॲप म्हणून नाव असलेल्या अनबॉक्स युअर डिझायर ॲपला साजेशी सेवा देण्यात येणार आहे.
या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणारे ग्राहक आणि सेवा पुरवठादार यांनी सोबतच्या लिंवकर क्लिक करून नावनोंदणी करावी.
सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करूनही गुगल फॉर्म उपलब्ध होईल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

