मुंबई : बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाने विविध विदेशी वन्यजीवांची तस्करी केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आली. मुंबई सीमाशुल्क विभागाच्या झोन-३ च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत हे उघड झाले. (तस्करी झालेल्या प्राण्यांचे फोटो बातमीच्या शेवटी दिले आहेत.)
प्रोफायलिंगच्या आधारे संशयित प्रवाशाला थांबवण्यात आले. तो एअर इंडिया फ्लाइट क्रमांक AI338 ने बँकॉकहून आज, ९ जून २०२५ रोजी मुंबईत दाखल झाला होता. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता तो खूप अस्वस्थ झाला आणि घाबरल्याचे दिसून आले. त्याच्या बॅगेची सखोल झडती घेतल्यावर ९६ वन्यप्राणी/पक्षी आढळले. त्यातले ३२ मृत होते. हे सर्व वन्यजीव पंचनामा करून जप्त करण्यात आले. संबंधित प्रवाशाला सीमाशुल्क कायदा, १९६२ अन्वये अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. प्रवाशाकडे आढळलेल्या वन्यजीवांचा तपशील पुढे दिला आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
चाको गोल्डन नी टरँच्युला (Grammostola pulchripes) – १ – CITES यादीत नाही.
टरँच्युला (Brachypelma spp.) – १ – CITES परिशिष्ट II व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (शेड्यूल IV) मध्ये सूचीबद्ध.
इग्वाना (Iguana spp.) – एकूण ८० (५० जिवंत, ३० मृत) – CITES परिशिष्ट II व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (शेड्यूल IV) मध्ये सूचीबद्ध.
ल्यूसिस्टिक शुगर ग्लायडर (Petaurus braviceps) – ६ – CITES यादीत नाही.
फायर टेल्ड सनबर्ड (Aethopyga ignicauda) – १ मृत – वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या शेड्यूल I मध्ये सूचीबद्ध; CITES यादीत नाही.
पर्पल थ्रोटेड सनबर्ड (Leptocoma sperata) – १ मृत – CITES यादीत नाही.
क्रेस्टेड फिंचबिल (Spizixos canifrons) – २ – CITES यादीत नाही.
हनी बेअर (Potos flavus) – १ – होंडुराससाठी CITES परिशिष्ट III मध्ये सूचीबद्ध.
ब्राझिलियन चेरी हेड टॉरटॉइज (Chelonoidis carbonarius) – २ – CITES परिशिष्ट II व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ (शेड्यूल IV) मध्ये सूचीबद्ध.
(CITES म्हणजे Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

















