ऐतिहासिक अंतराळमोहीम फत्ते! भारतासाठी सुवर्णक्षण

सॅन दिएगो : भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांची अ‍ॅक्सिओम 4 ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरची मोहीम फत्ते झाली असून, त्यांचा परतीचा प्रवास पूर्ण झाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार १४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून यशस्वीरीत्या विलग झाली होती. ही कॅप्सूल भारतीय प्रमाणवेळेनुसार १५ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.०२ वाजता सॅन दिएगोजवळ पॅसिफिक महासागरात उतरली आहे. अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक दिवस असून, भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठीही अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर या अंतराळवीरांनी ३१ देशांमधील ६० प्रयोग केले. त्यांपैकी सात प्रयोगांचं नेतृत्व भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने केलं होतं. राकेश शर्मा यांच्यानंतर ४१ वर्षांनी भारताला शुभांशू शुक्ला यांच्या रूपाने नवा अंतराळवीर मिळाला आहे. राकेश शर्मा यांनी म्हटल्याप्रमाणेच आजही अंतराळातून दिसणारा भारत ‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ असाच असल्याची भावना शुभांशू शुक्ला यांनी काल परतीच्या प्रवासाला सुरुवात करताना व्यक्त केली होती.

अ‍ॅक्सिओम 4 ही अंतराळ मोहीम खराब हवामानामुळे पुढे ढकलली जात होती. ती अखेर २५ जून २०२५ रोजी सुरू झाली. २५ जूनला दुपारी १२ वाजता अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून ही मोहीम सुरू करण्यात आली. स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून अंतराळवीरांनी उड्डाण केले. २८.५ तासांनंतर २६ जूनला सायंकाळी ४:३०च्या सुमारास हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाला जोडले गेले. भारताच्या शुभांशू शुक्ला यांच्यासह हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेचे अंतराळवीर या मोहिमेत सहभागी झाले होते. शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरले. ४१ वर्षांपूर्वी भारताचे राकेश शर्मा सोयूझ यानातून अंतराळात गेले होते.

ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी अंतराळातून पाठवलेला पहिला संदेश खालीलप्रमाणे आहे.
नमस्कार, मेरे प्यारे देशवासियों।
क्या सफ़र रहा!
41 साल बाद हम वापस अंतरिक्ष में पहुँच गए हैं और कमाल की राइड थी!
इस समय हम 7.5 किमी प्रति सेकंड की रफ्तार से पृथ्वी की चारों तरफ घूम रहे हैं, और मेरे कंधे पर मेरे साथ मेरा तिरंगा है, जो मुझे बता रहा है कि मैं अकेला नहीं हूँ, मैं आप सबके साथ हूँ।
यह मेरी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तक की यात्रा की शुरुआत नहीं है, यह भारत के ह्यूमन स्पेस प्रोग्राम की शुरुआत है, और मैं चाहता हूँ कि आप सभी देशवासी इस यात्रा का हिस्सा बनें।
आपका भी सीना गर्व से चौड़ा होना चाहिए। आप भी उतना ही उत्साह दिखाइए। आइए, हम सब मिलकर भारत के इस ह्यूमन स्पेस प्रोग्राम की यात्रा की शुरुआत करें।
धन्यवाद।
जय हिंद। जय भारत।

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply