रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहने नेण्यास आणि चालवण्यास पोलिसांनी घातली बंदी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहनं नेण्यास किंवा चालवण्यास जिल्हा पोलीस दलाने बंदी घातली आहे. या नियमाचा भंग करणाऱ्यांवर रत्नागिरी पोलीस दलाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. दापोली तालुक्यातल्या कर्दे किनाऱ्यावर एका पर्यटकाने वाळूतून धोकादायक पद्धतीने आणि वेगाने महिंद्रा थार चालवल्यामुळे नुकतीच गंभीर दुर्घटना घडली. संबंधित वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक नागरिकांनी सूचना दिल्या, तरी पर्यटकांकडून वाहनं किनाऱ्यावर वाळूत नेण्याचे आणि बेफिकीरपणे चालवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. त्यामुळे किनाऱ्यावरच्या अन्य व्यक्तींच्या जीविताला धोका निर्माण होतो. त्या पार्श्वभूमीवर, अशा घटना कोठेच घडू नयेत, म्हणून पोलिसांनी आता बंदीचं पाऊल उचललं आहे. दापोली, जयगड, रत्नागिरीसह सर्वच ठिकाणच्या किनाऱ्यांवर कोणालाच वाहनं नेता येऊ नयेत, म्हणून अडथळे उभारण्याचं काम पोलिसांनी ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतींच्या मदतीने सुरू केलं आहे. तरीही कोणी वाहन किनाऱ्यावर नेल्याचं आढळल्यास ११२ क्रमांकावर फोन करून किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, किनाऱ्यावर वाहनं नेता येऊ नयेत यासाठी पोलीस सध्या तयार असलेली अडथळ्यांची व्यवस्था तात्पुरती असून, कायमस्वरूपी पक्की बांधणी करून अडथळे (बॅरिकेटिंग) तयार करण्याचं काम जिल्हा परिषद, पर्यटन विभाग, ग्रामपंचायती आदींमार्फत होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी व्यक्त केली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply