
मानसी अशोक पवार यांनी करोनाच्या काळात मुंबईत चालू असलेलं काम सोडून गावी स्थायिक होऊन भाजीविक्रीचा व्यवसाय करायचं ठरवलं.
पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी….
करोनाच्या काळात,गावातली किंवा छोट्या शहरातली मोठ्या शहरात गेलेले काही लोक पुन्हा एकदा आपल्या गावाकडे परतली. काहींचा जॉब गेला, काहींनी महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काम सोडलं आणि ते पुन्हा आपल्या गावी आले. सध्या रत्नागिरीजवळच्या कारवांचीवाडी इथे राहणाऱ्या मानसी अशोक पवार याही त्यापैकीच एक. त्यांनी करोनाच्या काळात मुंबईत चालू असलेलं काम सोडून गावी स्थायिक व्हायचं ठरवलं. पण पोटापाण्यासाठी काय करायचं, असा प्रश्न त्यांना पडला. करोनाच्या काळात बाकी सारं बंद होतं. पण भाजीची दुकानं मात्र लवकर सुरू झाली. आपणही भाजीविक्रीचा करायचा, असं त्यांनी ठरवलं. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)
असं असलं, तरी भाजी विकण्यासाठी जागेचा प्रश्न होता. त्यांनी जागा बघितली होती. पण भाडं जास्त होतं. मग त्यांनी CMEGP (Chief Minister Employment Generation Programme – मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम) मधून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. मात्र व्यवसायात नवीनच असल्याने ग्राहक जास्त येत नव्हते. त्यामुळे विक्रीसाठी घेतलेली भाजी खराब व्हायची. प्रसंगी नुकसान व्हायचं. पण एकदा या व्यवसायात पाऊल ठेवल्यावर मागे यायचं नाही, ही भावना तीव्र असल्याने मानसीताई ठामपणे हा व्यवसाय नित्यनियमाने करू लागल्या.
व्यवसायात पडल्यावर आपोआप आपल्याला त्या व्यवसायाच्या वाढीसाठी लागणाऱ्या युक्त्या सुचत जातात, तोच मार्ग मानसीताईंनी अवलंबला.
सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीमधून थोडीच भाजी मागवून कमी दरात त्या भाजी विकू लागल्या. जसजशा ओळखी वाढत गेल्या, भाजी विक्रीचं मार्केटिंग होऊ लागलं, माऊथ टु माऊथ जाहिरात होऊ लागली, तेव्हा हळूहळू मानसीताईंचा भाजीचा व्यवसाय वाढू लागला. हा व्यवसाय मानसीताई आणि त्याचे पती दोघे मिळून सांभाळतात. रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या हंगामातल्या ताज्या भाज्या मानसीताईंकडे उपलब्ध असतात. भाजीच्या बरोबरच दुसऱ्या काही वस्तू ठेवून बघणं, फळं ठेवून बघणं अशा प्रकारचे प्रयोग त्या करत आहेत.
या व्यवसायामुळे मानसीताईंची आर्थिक गरज मात्र भागली. करोनाच्या काळात विस्कळित झालेली कुटुंबाची आर्थिक घडीही आता सुरळित झाली. कुठल्याही प्रसंगाला धीराने तोंड देऊन पुन्हा नव्याने उभं राहणं कठीण असतं, पण अशक्य नसतं, हे मानसीताईंनी दाखवून दिलं.
दिवसातले आठ-दहा तास त्या व्यवसायाला द्यावेच लागतात. मानसीताई घर सांभाळून तेवढा वेळ त्यांच्या दुकानासाठी प्रामाणिकपणे देतात. त्यांच्या याच प्रामाणिकपणाचं मोल म्हणजे त्यांचा अनेक बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड देऊन कधीतरी नुकसान झेलून आता सुरळित सुरू असलेला भाजीविक्रीचा उद्योग!हक समोरून खोबरं घेऊन आलं, तरच तेल काढून दिलं जातं. पण यावर्षी पावसाने आपला मुक्काम वाढवल्याने अशा प्रकारच्या उद्योगांवर त्याचा परिणाम झाला. पण तरीही अशा संकटांना घाबरून न जाता त्याला धीराने सामोरे जात, पुन्हा पुन्हा उभ्या राहून या खोबरेल तेलाच्या उद्योगामध्ये वाढ करण्याचं त्यांचं स्वप्न त्या नक्कीच पूर्ण करणार आहेत.
मानसी अशोक पवार – ८३५६८०४३०३
(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

