ग्रामीण भागातही मिळाला केकच्या व्यवसायाला प्रतिसाद

संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे गावातील सौ. पूर्वा पंकज काळोखे यांनी घरी केक तयार करून विकण्याचा सुरू केलेला व्यवसाय आता चांगलाच विस्तारित झाला आहे.
पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी…

आजकाल कुठलाही कार्यक्रम केकशिवाय पूर्णच होत नाही आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत केक सगळ्यांनाच खूप आवडतो. शहरात सहज उपलब्ध असलेला हा केक शहरानजीकच्या गावागावात अजून म्हणावा तसा सहज उपलब्ध झाला नाहीये. कदाचित हाच विचार डोक्यात ठेवून संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे गावात पूर्वा पंकज काळोखे यांनी घरी केक तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मागणीमुळे केक तयार करण्याचा स्वतःचा व्यवसाय करण्याचा त्यांचा विचार चालू होता. त्यानेच प्रेरित होत सुरुवातीला पाच हजार रुपयांमध्ये त्यांनी केक करून विकण्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)

उद्योगाच्या सुरुवातीला केकसाठी पूर्वा यांनी नेमक्या वस्तूच खरेदी केल्या आणि फुड लायसेन्सही काढलं. अगदी सुरुवातीला मार्केटिंगच्या अभावी म्हणावा तशी मागणी होत नव्हती. म्हणजे गावात केकला मागणी होती, पण आपल्या गावातच केक मिळू शकतो, हे ग्राहकांना माहीत नव्हतं. मग त्यांनी घराजवळ बॅनर लावून, त्यावर केकचे फ्लेवर स्वतःचं नाव आणि मोबाइल नंबर लिहिला. त्याचबरोबर मोबाइलमधील व्हॉट्सअॅप जाहिरातीसाठी उपयुक्त असल्याने त्यांनी काही ग्रुपवर जाहिरात करायला सुरवात केली. नंतर बाकी ठिकाणीही त्याचा आपोआपच प्रसार झाला. मार्केटिंगसाठी उपलब्ध असलेली सगळी साधनं त्यांनी अवलंबली आणि त्यामुळे त्यांचा केकचा व्यवसाय वाढू लागला.

या व्यवसायात तसं काही नुकसान होत नाही. कारण मागणी तसाच पुरवठा करायचा असल्यामुळे तयार झालेल्या मालाचा उठाव झाला नाही, तर काय करायचं हा दुकानदारांना पडणारा प्रश्न त्यांना पडला नाही. त्यामुळे झाला तर नफाच होतो, हे त्यांच्या लक्षात आलं.

सौ. पूर्वा काळोखे पूर्णवेळ गृहिणी असल्याने त्यांचं स्वतःचं उत्पन्नाचं काही साधन व्हतं. मात्र केकच्या व्यवसायामुळे त्यांना स्वतःची अशी कमाई होऊ लागली. घरखर्च चालवण्याइतके पैसेही मिळू लागले आणि स्वावलंबी जीवन काय असतं, हे त्यांना उमगलं. केक तयार करतानाही त्यांना खूप आनंद मिळतो. शिवाय घरचं सगळं बघून हा व्यवसाय करता येतो, असं त्या म्हणतात.

PMFME(Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना) योजनेअंतर्गत पूर्वा यांनी २५००० रुपयांचं बँकेतून कर्ज घेतलं आहे. त्यांच्या उद्योगाला मिळत असलेल्या प्रतिसादाच्या जोरावर आपण हे कर्ज लवकरच फेडू आणि आणखी गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेचं कर्ज आपण घेऊ शकू, असा त्यांना विश्वास आहे.

पूर्वाताई वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पूर्ण शाकाहारी केक तयार करतात. ग्राहकांच्या मागणीनुसार केकवरचं डिझाइनही त्या करतात. त्यांनी केक डिझायनिंगचा कोर्सही केला आहे.
याशिवाय पूर्वाताई शिलाईची कामं, घरात घरघंटी असल्याने दळणाची कामं करून संसाराला हातभार लावतात. स्वतःची काजूची बाग असल्याने काजूच्या हंगामात चार महिने काजूची बागही त्या सांभाळतात.

या सगळ्यात त्यांना चालक असलेल्या त्यांच्या पतीचा महत्त्वपूर्ण पाठिंबाही मिळाला आहे. पूर्वाताईंचं भविष्यात मोठी बेकरी सुरू करून वेगवेगळे बेकरी प्रॉडक्ट सुरू करण्याचं स्वप्न आहे. या व्यवसायासाठी त्या महिलांना प्रोत्साहित करून त्यांनाही रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करू इच्छितात. यासाठी कुणाला मार्गदर्शन हवं असल्यास तेही देण्याची त्यांची तयारी आहे.वर्षी पाऊस खूप पडल्याने त्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. एरवी पावसात खोबरं वाळवणं वगैरे गोष्टी होत नसल्याने त्यांच्या या व्यवसायाला ते चार महिने सुटीच असते. जर कुणी ग्राहक समोरून खोबरं घेऊन आलं, तरच तेल काढून दिलं जातं. पण यावर्षी पावसाने आपला मुक्काम वाढवल्याने अशा प्रकारच्या उद्योगांवर त्याचा परिणाम झाला. पण तरीही अशा संकटांना घाबरून न जाता त्याला धीराने सामोरे जात, पुन्हा पुन्हा उभ्या राहून या खोबरेल तेलाच्या उद्योगामध्ये वाढ करण्याचं त्यांचं स्वप्न त्या नक्कीच पूर्ण करणार आहेत.
पूर्वा पंकज काळोखे – ८६८९९४९५३१
(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply