रत्नागिरी : येथील आर्ट सर्कलतर्फे कै. नलिनी प्रताप कानविंदे स्मृती गझल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ ते ४० वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली असून मराठी, हिंदी किंवा उर्दू भाषेतील गझल स्वीकारली जाणार आहे.
स्पर्धकांनी आपली गझल ध्वनिमुद्रित करून नाव, वय व राहण्याचे ठिकाण नमूद करत २ एप्रिल २०२६ पर्यंत 8669082727 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कराओके किंवा लाइव्ह कार्यक्रमातील रेकॉर्डिंग स्वीकारले जाणार नाही. तानपुरा, हार्मोनियम व तबला या वाद्यांच्या साथीनेच ध्वनिमुद्रण अपेक्षित आहे.
प्राथमिक फेरीतून निवडलेल्या १० स्पर्धकांची यादी ९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल. अंतिम फेरी २६ एप्रिल रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझल गायक दत्तप्रसाद रानडे करणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १०,०००, ७,००० आणि ५,००० रुपयांची पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आर्ट सर्कलच्या वतीने करण्यात आले आहे.त. आजवर अत्यंत संवेदनशील विषयांना त्यांनी रंगभूमीवर आणले आहेत.
या दोन्ही नाटकांच्या निमित्ताने प्रेक्षकांना अप्रतिम नाट्यानुभव मिळणार आहे. सभासदांना ही नाटके विनामूल्य पाहता येणार आहेत, तर अन्य सर्वांसाठी अतिशय अल्प दरात देणगीमूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत. बैठक व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे.त आली आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

