जिजाऊ संस्थेच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत केदार टेमकर प्रथम

देवरूख : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या देवरूख केंद्राने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत कुडाळ येथील केदार टेमकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

संस्थेचे संस्थापक नीलेश भाऊसाहेब सांबरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेला राज्यभरातील कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध रंगसंगती, कल्पकता आणि सामाजिक संदेशांनी सजलेल्या रांगोळ्यांनी स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त करून दिले. स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात झाली. युद्धाच्या झळांनी होरपळणारी यंत्रणा आणि इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर वास्तववादी संदेश देणारी रांगोळी साकारत केदार टेमकर यांनी उपस्थितांची मने जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या कलाकृतीस प्रथम क्रमांकचे १० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

स्पर्धेत देवरूखमधील विलास विजय रहाटे यांनी दुसरा, तर कर्जत (रायगड) येथील मनोज नारायण चव्हाण यांनी तिसरा क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते असे : अभिषेक आनंद सुतार (भांडुप, मुंबई), अक्षय शिवाजी वहाळकर (देवरूख, रत्नागिरी), गौरव रमेश सुर्वे (रत्नागिरी).

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी तसेच कलारसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. स्पर्धकांनी आपल्या सर्जनशील कलाकृतींमधून उत्कृष्ट कौशल्य सादर करत स्पर्धेची शोभा अधिकच वाढवली. विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

केदार टेमकर (कुडाळ) यांची रांगोळी
विलास विजय रहाटे (देवरू) यांनी साकारलेली रांगोळी
कर्जत (रायगड) येथील मनोज नारायण चव्हाण यांची रांगोळी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा. टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स,गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply