रत्नागिरीत नवे ११९ करोनाबाधित रुग्णालयात दाखल; सिंधुदुर्गात ७६ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ६) नवे ११९ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४८५५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७६ नवे बाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १८३३ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या बाधित ११९ रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – गुहागर ३, चिपळूण १७, रत्नागिरी ३३, लांजा २ (एकूण ५५). रॅपिड अँटीजेन टेस्ट – खेड २४, गुहागर ९, चिपळूण १९, संगमेश्वर १, रत्नागिरी ५९, लांजा ७. (एकूण ६४).

आज रत्नागिरीत तिघा पुरुष रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यातील ७५ वर्षे वयाचा रुग्ण चिपळूण तालुक्यातील, ८५ वर्षांचा रुग्ण लांजा तालुक्यातील, तर ५६ वर्षांचा रुग्ण खेड तालुक्यातील आहे. जिल्ह्यातील मृतांचे प्रमाण २.९८ टक्के आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड २, खेड १७, दापोली २२, चिपळूण ३१, गुहागर ४, संगमेश्वर १२, रत्नागिरी ४४, लांजा ५, राजापूर ८ (एकूण १४५).

आज ४१ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत ३०१८ जण करोनामुक्त झाले आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६२.१६ टक्के आहे. मुंबईसह इतर क्षेत्रांतून आल्यामुळे सध्या ५४५६ जण होम क्वारंटाइन झाले आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ७६ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १८३३ झाली आहे. आतापर्यंत ८६८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप २८९ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९२७८ व्यक्ती क्वारंटाइन आहेत. तसेच, जिल्ह्यात सध्या २२९ कंटेन्मेंट झोन आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply