रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ सप्टेंबर) ७० नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६७६९ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज १६७ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात ४८ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ३०८५ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२१ सप्टेंबर) १६७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील ४९१६ जण बरे झाले आहेत. काल २३५ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले होते. कालपर्यंत बरे होणाऱ्यांची टक्केवारी ७०.८९ टक्के होती. आज ती वाढून ७२.६२ टक्के झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील करोनाच्या रुग्णांमध्येही आज सलग चौथ्या दिवशी घट झाली आहे. आज ७० नवे करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६७६९ झाली आहे. आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – खेड ६, गुहागर ६, चिपळूण १०, संगमेश्वर ११, रत्नागिरी २३, राजापूर १. (एकूण ५७). रॅपीड अँटिजेन टेस्ट – दापोली २, चिपळूण ४, रत्नागिरी ६, लांजा १. (एकूण १३).
आज करोनाच्या तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २२० झाली आहे. जिल्ह्यातील करोनाचा मृत्युदर ३.२५ असा आहे.
आज मरण पावलेल्यांचा तालुकानिहाय तपशील असा – खेड वय ७०, पुरुष. रत्नागिरी वय ६२, पुरुष. रत्नागिरी वय ७८, महिला. आजपर्यंतच्या मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी ६४, खेड ३८, गुहागर ६, दापोली २५, चिपळूण ५२, संगमेश्वर १९, लांजा ६, राजापूर ८, मंडणगड २ (एकूण २२०).
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ सप्टेंबर) आणखी ४८ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३०८५ झाली आहे. आतापर्यंत १९१६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ७५३ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८१४७ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ७७८ व्यक्ती आहेत.


